BLOG 2

जवळपास 20 वर्षांपूर्वी युरेका डोअर्स ची स्थापना झाली. युरेका डोअर्स चे MD डॉक्टर प्रमोद सर शालेय वयात राष्ट्रसेवा दल संस्थेच्या शाखेत जात असत. अनेक समाजोपयोगी सेवांसाठी त्यांना देणग्यांसाठी खूप फिरावे लगे. दिवसभर फिरून त्याकाळी जेमतेम दोन तीन रुपये जमत. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की, “मी चांगलं कमवायला हवंय, कारण समाजोपयोगी कामासाठी इतकी तुटपुंजी रक्कम कशी पुरणार?”

शाळेत असतांना सरांनी पेनच्या रिफिल्स बनवण्याचा business करायचे ठरवले. मित्रांसोबत ते रिकाम्या रिफिल्स गोळा करत. त्याचं निब काढून त्यात शाई भरायची आणि निब लावून रिफिल्स विकायच्या असे ठरले. एका दुकानदाराशी शाई मिळण्यासंबंधी रितसर बोलणीही केली. घरी पालकांना या गोष्टी कळल्या आणि खूप बोलणी बसली. वडिलांनी सांगितले की, “आत्ता फक्त शिक्षण एके शिक्षण! पदवी घेऊन मग काय ते करा”. त्यांनतर प्रमोद सरांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग , MA पॉलिटिक्स , MBA मार्केटिंग करून entreprenuership विषयात Ph.D.केली.

बिझनेस करायचे मनात पक्के असल्याने, इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यावर पेंट्स मॅन्युफॅक्चरिंग, बीडिंग पट्टी ट्रेडिंग, कॉम्पुटर इन्स्टिट्यूट इत्यादी अनेक प्रकारचे business सुरू केले. दिल्लीला एका प्रदर्शनात PVC मटेरिअलची माहिती मिळाली. काळाची गरज ओळखून बाथरूम मध्ये लाकडी दरवाज्यांना पर्याय असणे महत्वाचे वाटले. न सडणारे, न कुजणारे, वाळवी कीड न लागणारे, आग रोधक, टिकाऊ असे PVC दरवाजे बनवण्यास सुरुवात केली. अर्थात त्यात खूप आव्हानं होती. PVC मटेरियल नैसर्गिकरित्या खूप टिकाऊ आहे, पेंटेबल आहे, त्याला मजबूत बनवण्यासाठी आणि सर्व प्रकारचे हार्डवेअर बसवता यावे यासाठी स्क्रू धरून ठेवण्याची क्षमता देण्याचे विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते.

प्रमोद सरांचे अभियांत्रिकी शिक्षण, चिकित्सक- शोधक वृत्तीमुळे दरवाज्यांमध्ये स्ट्रेंथ आणि रिइन्फोरसमेन्ट यावी याकरता शोधाअंती त्यात MS मटेरियलच्या पाईपची फ्रेम टाकण्यात आली.

दरवाजे बनवतांना प्रचंड ऍक्युरसी लागणार होती कारण एकदा बनलेल्या दरवाजाची उंची फक्त काही मिलिमीटर कमी करता येते आणि रुंदीला काहीच बदल करता येत नाहीत; त्यामुळे दरवाजा मिसफिट होऊन रिजेक्ट होण्याची शक्यता असते, त्यासाठी स्ट्रॉंग सिस्टीम बसवण्याचे मोठे काम केले. छोट्या ऑर्डर्स सुरू झाल्या. पहिली मोठी ऑर्डर स्नेहालय संस्थेची पन्नास दरवाज्यांची आली, जी रात्रंदिवस जागून प्रमोद सर , उत्तम सरांनी (जे मार्केटिंग आणि प्रॉडक्शन चे काम बघत) कामगारांच्या मदतीने पूर्ण केली. ते युरेका डोअर्सचं पहिलं मोठं यश होतं. तेव्हा युरेका डोअर्सचे संगमनेर मध्ये प्रॉडक्शन युनिट होते. इतकी मोठी ऑर्डर यशस्वीपणे पूर्ण करुन एक मोठा बेंचमार्क सेट झाला आणि युरेका डोअर्सच्या पुढील वाटचालीस सुरुवात झाली.

There are 2 comments

 1. 720p izle

  Wonderful post! We are linking to this particularly great content on our website. Halli Laughton Gatian

  December 10, 2020, 12:47 am
  1. Eureka India

   Thank you so much!

   December 10, 2020, 3:41 am

Leave Comment Cancel Reply