BLOG 4

संवेदनशीलता आणि माणुसकी ही युरेका डोअर्स च्या कोअर व्हॅल्यू पैकी एक! कोणतीही समाजोपयोगी गोष्ट केली की आमचे टीम मेम्बर्स ‘Compassion’ या कोअर व्हॅल्यू ने जगल्याचे सांगतात… ‘compassion’ म्हणजे ‘करुणा’.. इतरांची वेदना समजून घेण्याची आणि त्यांना मदत करण्याची अंतःप्रेरणा!

एकदा आमचे एम. डी. डॉ. प्रमोद सर एका हायवेवरून जात असताना त्यांना एके ठिकाणी खूपसे पक्षी कुठल्यातरी प्राण्याला चोच मारतायेत असे काहीसे दिसले. त्यांनी त्यांची गाडी थांबवली आणि काय प्रकार आहे ते बघायला ते गेले. त्यांनी जे पाहिलं ते फारच विदारक होतं!

तो कुठला प्राणी नाही तर रस्त्याच्याकडेला पडलेला एक मतिमंद मुलगा होता जो झोपून असल्याने पक्षी त्याला त्रास देत होते..

त्या मुलाला सरांनी आपल्या गाडीत ठेऊन त्याची जवळच्या गावात चौकशीकरून त्याच्या घरापर्यंत पोहोचवले.. त्या मुलाची आई शेतात काम करत होती, आपल्या मुलाच्या ख्यालीखुशालीचे तिला सोयरसुतक नव्हते. तिला दोनवेळच्या जेवणाची आणि तिच्या इतर मुलांची भ्रांत! त्यामुळे हा बिनकामाचा, त्रासदायक मुलगा असला काय नि नसला काय याची तिला फिकीर नव्हती…

फक्त वाईट वाटून घेऊन पाहत राहणे हा सरांचा स्वभाव नसल्याने काहीतरी मार्ग निघायलाच हवा असा विचार केला..

अशी अनेक उपेक्षित मतिमंद मुलं या समाजात आहेत जी यातना भोगतायेत हे त्यांना दिसून आले.

‘चैतन्य सेवाभावी संस्था’ या सोशल ट्रस्ट ची स्थापना अनेक अडथळे पार करत प्रमोद सरांनी केली आणि आज तिसहून अधिक मतिमंद मुलं ‘श्री साई सेवा संस्था’ या मोफत निवासी शाळेत शिकत आहेत.

शाळेतील सर्व स्पेशल किड्सना आज हक्काचे छत आणि जगण्याची उमेद मिळाली आणि सरांनी काय मिळाले, अर्थात समाधान, मनःशांती, ऊर्जा…!

प्रमोद सर अनेक सामाजिक संस्थाच्या ट्रस्टचे काम बघतात आणि स्वतःच्या मनातील ‘compassion’ या कोअर व्हॅल्यू ला जगवत असतात!

जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू या मधील प्रवास… यातील फक्त दोन गोष्टी शाश्वत बाकी सर्व अशाश्वत! आपल्या जगण्याचा मार्ग, त्याचे प्रयोजन ठरवण्यासाठी परमेश्वराने दिलेली बुद्धी, निरीक्षण शक्ति, आत्मपरीक्षण आणि क्षमतांची चाचणी करणे इतकेच आपल्या हातात असते.
सद्सद्विवेक बुद्धी ही संवेदनशील मनाची पहिली पायरी त्याच्या पुढच्या पायऱ्यांची वाट आपल्या मनातील ‘compassion’ वर अवलंबून असते.. त्याचे काहीच मोजमाप नाही!!!